सिडनी : भारतीय संघाने वर्ल्ड कपपूर्वी खराब कामगिरीतून शानदार कमबॅक केले आहे, याचे संपूर्ण श्रेय गोलंदाजांना जाते. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविण्याचा ही योग्य वेळ असल्याचे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची या पेक्षा चांगली वेळ येणार नाही. आतपर्यंत आम्ही ऑस्ट्रेलियात ज्या पद्धतीची कामगिरी केली आहे. त्याला न्याय देण्याची ही वेळ आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्राय सिरीजमध्ये आमची कामगिरी चांगली झाली नव्हती.
भारताने ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सिरीजमध्ये ०-२ ने पराभव पत्करला होता. त्यानंतर तिरंगी मालिकेत भारत एकही सामना जिंकू शकला नाही. पण वर्ल्ड कपमध्ये या उलट कामगिरी करत भारताने लगोपाठ सात सामने जिंकले आहेत. यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलने म्हटले होते की भारतीयांनी आठवावे की भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदाही ऑस्ट्रेलियाने हरविले नाही.
कोहलीने म्हटले की वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया स्वतःला तयार करीत होती. टीम म्हणून आम्हांला चांगली कामगिरी करण्याची आणि चुकीची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे वाटले. आमच्याकडे जास्त वेळ नव्हता.
त्यामुळे आम्ही वर्ल्ड कपसाठी एकत्र आलो आणि ज्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज होती, त्या लिहून घेतल्या. गोलंदाजाबाबत कोहली म्हणाला, ज्या पद्धतीने गोलंदाजांनी आत्मविश्वास आणि आक्रमता दाखविली, त्याने आम्ही जगातील मोठ्या संघाना पराभूत करण्यात यशस्वी ठरलो. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.