गूगल डूडलचा पहिल्या कसोटी क्रिकेटला सलाम, 140 वर्षे कसोटीला पूर्ण

आजच्या दिवसी कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. आज बरोबर 140 वर्षे या गोष्टीला झालीत. 1877 मध्ये 15 मार्चला जगातील पहिला कसोटी क्रिकेट सामना झाला. याबाबत गूगलने डूडलच्या माध्यमातून ही आठवण ताजी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 15, 2017, 10:14 AM IST
गूगल डूडलचा पहिल्या कसोटी क्रिकेटला सलाम, 140 वर्षे कसोटीला पूर्ण title=

मुंबई : आजच्या दिवसी कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. आज बरोबर 140 वर्षे या गोष्टीला झालीत. 1877 मध्ये 15 मार्चला जगातील पहिला कसोटी क्रिकेट सामना झाला. याबाबत गूगलने डूडलच्या माध्यमातून ही आठवण ताजी केली.

कसोटी म्हटले की पाच दिवस क्रिकेट खेळले जाते. एका दिवसात 90 ओव्हर टाकली जातात. प्रत्येक संघाला दोन वेळा गोलंदाजीसाठी बोलविले जाते.

15 मार्च 1877 मध्ये मलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना झाला. तो 19 मार्चपर्यंत सुरु होता. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 45 रन्सने हरविले.

या कसोटी सामन्या ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. अल्फ्रेड शॉने चार्ल्स बॅनरमॅन याने पहिला बॉल टाकला. तर बॅनरमॅन कसोटीत पहिले शतक ठोकणारा खेळाडू ओळखला जातो. त्याने 165 रन्स केले होते.