बीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क

 दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना पुन्हा टीम इंडियाचे कोच बनविले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)यासाठी गॅरी कर्स्टनशी संपर्क साधला होता. 

Updated: Oct 16, 2015, 03:50 PM IST
बीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क  title=

मुंबई :  दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना पुन्हा टीम इंडियाचे कोच बनविले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)यासाठी गॅरी कर्स्टनशी संपर्क साधला होता. 

इंग्रजी वृत्तपत्र मुंबई मिररने दिलेल्या बातमीनुसार ४७ वर्षीय गॅरी कर्स्टन यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. बातमी गुरू गॅरीच्या हवाल्याने देताना सांगितले, की बीसीसीआयने यासाठी तीन कॉल केले आहे. पण अजून त्यांनी निर्णय घेतला नाही, तशी मनस्थिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

कर्स्टन म्हणाले या प्रस्तावावर हो किंवा नाही म्हणणे कठीण आहे.  पाहू या कशी परिस्थिती होते. दरम्यान, कर्स्टनने भारतीय संघाच्या कोचच्या रूपात पुन्हा येण्याची शक्यताही फेटाळली नाही. यापूर्वी २००८ ते २०११ या कालावधीत टीम इंडियाचे कोच म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भारतीय टीमचे कोचिंग दिल्यानंतर कर्स्टन २०११ ते २०१३ दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कोच होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.