धोनीला कर्णधार पदावरून हटविण्यावर बोलले गुरू गॅरी

 भारतीय वन डे टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला कर्णधार पदावरून हटविण्याच्या प्रश्नावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच गॅरी कर्स्टनने कडक प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Nov 2, 2016, 05:10 PM IST
धोनीला कर्णधार पदावरून हटविण्यावर बोलले गुरू गॅरी title=

नवी दिल्ली :  भारतीय वन डे टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला कर्णधार पदावरून हटविण्याच्या प्रश्नावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच गॅरी कर्स्टनने कडक प्रतिक्रिया दिली आहे. 

गेल्या काही दिवसापासून वन डे टीमची धुरा कर्णधार धोनीच्या ऐवजी  विराट कोहलीकडे सोपवावी अशी शिफारस अनेक जण करत आहेत. कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या शानदार कप्तानी आणि फलंदाजीमुळे छाप सोडत आहे. त्यामुळे त्याच्याकडे वन डेचीही धुरा देण्याचे सांगण्यात येत आहे. 

महेंद्रसिंग धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण २०११च्या विश्व विजेत्या भारतीय संघाचे कोच गॅरी कर्स्टन यांनी या शिफारशीवर टीका केली आहे. 

धोनीला आपल्या जोखमीवर हटवू शकतात. धोनीकडून कोहलीला वनडेची धुरा देण्याबाबत गुरू गॅरींना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले याचे काही उत्तर नाही. धोनीला आपल्या रिस्कवर रिप्लेस करा. २०१९ मध्ये वर्ल्ड कप अभियानात धोनी भारताच्या संधात नसेल तर भारताच्या कामगिरीवर फरक पडू शकतो. 

भारतीय संघासाठी धोनीने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या १० वर्षांचा रेकॉर्ड पाहिला तर त्यांची यशाची काहणी सांगते. धोनीचे नाव महान कर्णधारांमध्ये आहे, असेही गुरू गॅरी म्हणाले...