स्पिनर्सनी नोबॉल टाकणे अस्वीकारार्ह - गावस्कर

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याने लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी जोरदार टीका केलीये. 

Updated: Apr 2, 2016, 10:32 AM IST
स्पिनर्सनी नोबॉल टाकणे अस्वीकारार्ह - गावस्कर title=

मुंबई : टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याने लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी जोरदार टीका केलीये. 

स्पिनर्सनी नोबॉल कसे काय टाकू शकतात असा संतप्त सवाल गावस्कर यांनी केलाय. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. वेगवान गोलंदाजी करताना नोबॉल टाकणे होऊ शकतं मात्र स्पिनर्सने नोबॉल टाकण अस्वीकारार्ह आहे, असे गावस्कर यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी वेस्ट इंडिजच्या सांघिक कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याचे दाखवून दिल्याचे ते म्हणाले. भारताला पहिल्यांदा फलंदाजी करताना २० धावा कमी पडल्या. अन्यथा भारताला विजय मिळाला असता असेही त्यांनी सांगितले.