भारत वि. ऑस्ट्रेलिया : विराटची कॅप्टन इनिंग अपयशी

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतला ४८ रन्सनं हरवलंय. 

Updated: Dec 13, 2014, 01:24 PM IST
भारत वि. ऑस्ट्रेलिया : विराटची कॅप्टन इनिंग अपयशी  title=

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतला ४८ रन्सनं हरवलंय. 

ऑस्ट्रेलियानं समोर ठेवलेल्या ३६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शनिवारी टीम इंडियाची सुरुवात थोडी खराबच झाली होती. मात्र, मुरली विजय मैदानावर तळ ठोकून उभा राहिला... आणि त्याला उत्तम साथ दिली ती कर्णधार विराट कोहलीनं... 

विराट कोहलीनं १३५ बॉल्समध्ये आपल्या टेस्ट करिअरमधलं आपलं सातवं शतक ठोकलं.  कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळताना विराटनं दुसरं शतक ठोकून इतिहास रचला. मात्र, मुरली विजयचे शतक एका रन साठी हुकलं.

मुरली विजयनंतर फलंदाजीसाठी आलेला अजिंक्य रहाणे लायनच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. 

शिखर धवनच्या रूपाने भारताला सदोष पंचगिरीचा फटका बसला. नऊ रन्सवर खेळत असताना मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर धवन झेलबाद झाला. मात्र, रिप्लेमध्ये बॉल धवनच्या खांद्याला लागून गेल्याचं स्पष्टपणे दिसलं. त्यामुळे पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय. 

याआधी, ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशीच २९० धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. त्यामुळे भारतासमोर ३६४ धावांचे लक्ष्य होते. याचा पाठलाग करताना भारताचे इतर खेळाडुंपैकी चेतेश्वर पुजारा २१ रन्स, अजिंक्य राहाणे शून्य रन, रोहित शर्मा ६ रन, वृद्धिमान साहा १३ रन्स, करण शर्मा नाबाद ४ रन्स, मोहम्मद शामी ५ रन्स, वरून अरोन १ रन आणि इशांत शर्मा १ रनवर बाद झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.