नॉटिंगहॅम : इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ६० धावांवर बाद झाला.
इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लडची सुरूवातच दमदार झाली. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर ब्रॉडने रॉजर्सला बाद केले. त्यावेळी ऑस्ट्रलियाचा स्कोर ४ होता. त्यानंतर १२ व्या षटकापर्यंत इंग्लडची स्थिती ९ बाद ४७ अशी झाली. १८. ३ षटकात संपूर्ण संघ ६० धावांवर बाद झाला.
इंग्लडकडून स्टुअर्ट ब्रॉड याने ९.३ षटकात १५ धावा देत ८ विकेट घेतल्या. यात त्याने पाच ओव्हर निर्धाव टाकल्या. तर वुड आणि फिन याने प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल जॉन्सन याने सर्वाधिक १३ धावा केल्या. त्यानंतर मायकल क्लार्क याने १० धावा केल्या.
पाहू या लाइव्ह स्कोअरकार्ड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.