जिंकल्यावर खेळाडू पदक का चावतात?

मोठ्या क्रीडास्पर्धांमध्ये पदक जिंकल्याचा आनंद काही औरच असतो. त्यातही ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत पदक जिंकणे म्हणजे सर्वात मोठी गोष्ट. अशा स्पर्धांमध्ये पदक जिकल्यानंतर खेळाडू विनिंग पोझ देताना ते पदक दातांमध्ये धरतात.

Updated: Aug 17, 2016, 01:58 PM IST
जिंकल्यावर खेळाडू पदक का चावतात? title=

रिओ : मोठ्या क्रीडास्पर्धांमध्ये पदक जिंकल्याचा आनंद काही औरच असतो. त्यातही ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत पदक जिंकणे म्हणजे सर्वात मोठी गोष्ट. अशा स्पर्धांमध्ये पदक जिकल्यानंतर खेळाडू विनिंग पोझ देताना ते पदक दातांमध्ये धरतात.

मात्र असे का करतात हे तुम्हाला माहीत आहे का? पहिले कारण-  ही पद्धत फोटोग्राफरच्या आग्रहामुळेच सुरु झाल्याचे मत ऑलिम्पिक अभ्यासक डेव्हिड व्हॉलचीनस्काय यांनी व्यक्त करतात. त्यांच्या मते फोटोग्राफर्सना विजेत्या खेळाडूंचे विविध पोझमध्ये फोटो हवे असतात. त्यामुळे त्यांनीच ही पद्धत सुरु केली असे त्यांना वाटते.

दुसरे कारण - मिळालेले पदक खरे आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्या पदकाचा चावा घेतला जातो असेही म्हटले जातो. ते पदक अस्सल सोन्याचे असेल त्यावर दाताच्या खुणा दिसतात. मात्र त्यात इतर घातून मिसळले असल्यास दातांना दुखापत वा त्रास होण्याची शक्यता असते.