टेस्ट मॅचमध्ये एकट्या बॉलरनं घेतल्या 19 विकेट

वर्ष 1956, तारीख 31 जुलै, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान ऍशेज सीरिज. तब्बल 58 वर्षांपूर्वी पहिल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या विरोधात मॅन्चेस्टर ऑल्ड ट्रेफर्डमध्ये खेळल्या गेलेल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचे ऑफ स्पिनर जिम चार्ल्स लेकर यांनी शानदार बॉलिंग करत टेस्टमध्ये रेकॉर्ड केला. एका मॅचमध्ये तब्बल 19 विकेट घेतल्या. 

Updated: Aug 2, 2014, 07:21 PM IST
टेस्ट मॅचमध्ये एकट्या बॉलरनं घेतल्या 19 विकेट title=

नवी दिल्ली: वर्ष 1956, तारीख 31 जुलै, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान ऍशेज सीरिज. तब्बल 58 वर्षांपूर्वी पहिल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या विरोधात मॅन्चेस्टर ऑल्ड ट्रेफर्डमध्ये खेळल्या गेलेल्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचे ऑफ स्पिनर जिम चार्ल्स लेकर यांनी शानदार बॉलिंग करत टेस्टमध्ये रेकॉर्ड केला. एका मॅचमध्ये तब्बल 19 विकेट घेतल्या. 

या टेस्टमध्ये इंग्लंडचे जिम यांनी पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 10 विकेट घेतल्या. इंग्लंडनं ऑस्ट्रेलिया विरोधातली ही मॅच 170 रन्सनं जिंकली होती. या मॅचमध्ये इतकी शानदार बॉलिंग झाली की मॅचला ‘लेकर्स मॅच’ या नावानं ओळखलं जावू लागलं. 

टेस्ट क्रिकेटमध्ये 10 विकेट घेण्याचा रेकॉर्ड करणारे ते पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. 

लेकर यांनी इंग्लंडसाठी 1948 ते 1958पर्यंत टेस्ट मॅच खेळल्या त्यात 21.24च्या सरासरीनं 193 विकेट घेतल्या. फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये लेकर यांनी 18च्या सरासरीनं 1,944 विकेट घेतल्या होत्या.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.