प्लेइंग इलेवनमध्ये बदलाच्या मूडमध्ये नाही धोनी

 टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये यापूर्वीच जागा बनवली असली तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनी झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेवनमध्ये कोणत्याही बदल करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. कोणी जखमी झाले तरच टीममध्ये बदल करण्याच्या मानसिकतेत धोनी आहे. 

Updated: Mar 12, 2015, 09:42 PM IST
प्लेइंग इलेवनमध्ये बदलाच्या मूडमध्ये नाही धोनी title=

ऑकलंड :  टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये यापूर्वीच जागा बनवली असली तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनी झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेवनमध्ये कोणत्याही बदल करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. कोणी जखमी झाले तरच टीममध्ये बदल करण्याच्या मानसिकतेत धोनी आहे. 

धोनीने टीममध्ये बदल केल नाहीत, आणि या प्लानिंगला फॉलो केले तर अजूनही अंबाती रायडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी आणि भुवनेश्वर कुमार यांना बाहेरच बसावे लागले. भुवनेश्वर याने मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत एक सामना खेळला आहे. उमेश यादव, शमी आणि मोहित शर्मा या तेज गोलंदाजांच्या त्रिकुटाने भुवनेश्वरची कमतरात भासू दिली नाही. 

आपल्या कोणत्याही नियमीत खेळाडूला बाहेर ठेवणार नसल्याचे धोनीने यावर स्पष्ट केले. पर्थमध्ये वेस्ट इंडिजच्या विरूद्ध सामन्यानंतर सांगितले की , जे खेळाडू बाहेर आहे ते बाहेरच राहतील. आयर्लंड विरूद्धच्या सामन्यावेळी तो म्हणाला, हा सामना  औपचारिक आहे, पण प्रयोग करण्याचा विरोधात आहे. 

धोनीला विचारण्यात आले की काही खेळाडूंना विश्रांती देणार का, त्यावर तो म्हणाला, आम्ही फिजिओकडून इनपूट घेऊ, फिजिओला वाटत असेल की सामना खेळल्याने कोणी जखमी होऊ शकतो. अशा स्थितीत त्या प्लेर्सला विश्रांती देण्यात येऊ शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.