वेलिंग्टन : दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने गुरूवारी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स बनविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे.
या शिवाय कोणत्याही एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. डिव्हिलिअर्सने आज यूएई विरूद्ध ९९ धावा केल्यामुळे त्याची वर्ल्ड कपमधील धावांची संख्या ११४२ वर पोहचली आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर पोहचला आहे.
या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २२७८ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. आजच्या खेळीत डिव्हिलिअर्सने चार षटकार लगावले. त्यामुळे २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये एकूण षटकारांची संख्या २० झाली आहे. त्याने मॅथ्यू हेडनच्या २००७ मधील १८ षटकारांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
डिव्हिलिअर्सने वर्ल्ड कपमध्ये एकूण ३६ षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉइंटिंग याने ३१ षटकार, वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने २९ षटकार लगावले आहेत.
आज डिव्हिलिअर्स ९९ धावांवर बाद झाला. तो तिसरा फलंदाज आहे की जो ९९ धावांवर बाद झाला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलक्रिस्ट २००३ मध्ये श्रीलंकेवरूद्ध आणि जे. पी. ड्युमिनी २०११मध्ये आयर्लंड विरूद्ध ९९ धावांवर बाद झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.