सहा वेळेचा चॅम्पियन जोकविचचा धक्कादायक पराभव

दुसऱ्या मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये धक्कादायक पराभव सहन करावा लागला. 

Updated: Jan 19, 2017, 04:50 PM IST
सहा वेळेचा चॅम्पियन जोकविचचा धक्कादायक पराभव title=

नवी दिल्ली : दुसऱ्या मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये धक्कादायक पराभव सहन करावा लागला. 

त्याला 117 व्या मानांकित डेनिस इस्टोमिनकडून पराभव पत्करावा लागला. 2008 विम्बल्डननंतर जोकोविचला ग्रँडस्लॅमच्या दुसऱ्या राऊंडमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला.

4 तास 48 मिनिट रंगलेल्या या मुकाबल्यात इस्टोमिननं बाजी मारली. जोकोविचला इस्टोमिनकडून 7-6, 5-7, 2-6, 7-6, 6-4 नं पराभव सहन करावा लागला.

बारा ग्रँडस्लॅम आणि सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचचा हा पराभव ऑस्ट्रेलियन ओपनमधील पहिला मेजर अपसेट ठरलाय.