मुंबई : दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोन्ही महिला क्रिकेटपटूंच्या विश्वविक्रमी त्रिशतकी पार्टनरशिपच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट टीमनं आयर्लंडवर दणदणीत विजय मिळवला.
दोघींनी पहिल्या विकेटसाठी रेकॉर्डब्रेक 320 रन्सची पार्टनरशीप केली. सेनवेस पार्कमध्ये झालेल्या लढतीत भारताच्या मिताली राजनं टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवत दिप्ती आणि पूनमनं पहिल्या विकेटसाठी 273 बॉल्समध्ये 320 ची पार्टनरशीप रचली...
46 व्या ओव्हर्समध्ये आयर्लंडला ही जोडी फोडण्यात यश आलं. दीप्ती शर्मानं 27 फोर आणि 2 सिक्सर्ससह 188 तर पूनम राऊतनं 116 चेंडूत 109 रन्स केले. दीडशेच्या वर रन्स करणारी दीप्ती ही पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरलीय.
359 रन्सचा पाठलाग करताना आयर्लंडचा महिला संघाची इनिंग 109 रन्सवर आटोपला. राजेश्वरी गायकवाडनं 4 तर शिखा पांडेनं 3 विकेट्स घेत आयर्लंडला पराभवाचा धक्का दिला.
# महिला क्रिकेटमधील 320 धावांची सर्वोत्तम भागीदारी, यापूर्वीची 268 (इंग्लंडच्या टेलर - ऍटकिन्स, वि. आफ्रिका)
# भारताची सर्वोत्तम भागीदारी, यापूर्वी नाबाद 258 (रेश्मा गांधी- मिताली राज, वि. आयर्लंड, 1999)
# दीप्ती शर्माच्या 188 धावा, भारताच्या सर्वोत्तम, जया शर्मा (नाबाद 138, वि. पाकिस्तान, 2005) मागे टाकले
# जागतिक महिला क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या धावा बेलिंडा क्लार्क (229 नाबाद सर्वोत्तम)
# भारताच्या सर्वोत्तम 358 धावा, जागतिक क्रमवारीत दहाव्या
# 175 पेक्षा जास्त धावा करणारी सर्वांत लहान खेळाडू (पुरुष आणि महिला धरून)