चौथ्या दिवसाअखेर भारताकडे सहा गोल्डसहीत 22 मेडल्स!

चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताच्या खात्यात तब्बल 22 मेडल्स जमा झालेत... आत्तापर्यंत भारतानं 6 गोल्ड, 9 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल्सची कमाई केलीय. या मेडल टॅलीसहीत भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या टेबल्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.  

Updated: Jul 28, 2014, 12:47 PM IST
चौथ्या दिवसाअखेर भारताकडे सहा गोल्डसहीत 22 मेडल्स! title=
गोल्ड मेडलिस्ट सतीश शिवलिंगम

मुंबई : चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताच्या खात्यात तब्बल 22 मेडल्स जमा झालेत... आत्तापर्यंत भारतानं 6 गोल्ड, 9 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल्सची कमाई केलीय. या मेडल टॅलीसहीत भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या टेबल्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.  

सतीश शिवलिंगम – वेटलिफ्टर – गोल्ड 
भारताकडून पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झालेल्या. सतीश शिवलिंगम यानं 77 किलो वजनी गटात नवीन रेकॉर्ड कायम करत गोल्ड मेडल हस्तगत केलंय. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप 2013 चा गोल्ड मेडलिस्ट असणाऱ्या 22 वर्षीय सतीशनं एकूण 328 किलो (149 किलो आणि 179 किलो) वजन उचललंय. याचबरोबर, सतीशनं स्नॅच वर्गात, नौरुच्या युको पीटरनं दिल्ली कॉमनवेल्थ 2010 मध्ये बनवलेला 148 किलोचा रेकॉर्डही तोडलाय.

रवि कुमार – वेटलिफ्टर - सिल्व्हर
सतीश शिवलिंगमच्या पाठोपाठ भारताच्याच रवि कुमारनं सिल्व्हर मेडलवर ताबा मिळवलाय. त्यानं 317 किलो (412 किलो आणि 175 किलो) वजन उचलून सिल्व्हर मेडल हस्तगत केलं. यावेळी, सतीश, रविच्या मागोमाग ऑस्ट्रेलियाच्या फ्रांकोइस ई नं 314 किलो वजन उचलून ब्राँझ मेडल मिळवलंय. 

पूनम यादव – वेटलिफ्टिंग – ब्राँझ
उत्तर प्रदेशच्या 19 वर्षीय पूनम यादवने वेटलिफ्टिंगमध्ये ब्राँझ मेडल पटकावलय. 63 किलो वजनी गटात पूनमने 202 पॉईंट्सची कमाई करत मेडलवर नाव कोरलं. दरम्यान, भारताच्या वंदना गुप्ताला चौथ्या स्थानी समाधान मानाव लागलं. गोल्ड आणि सिल्व्हर मेडलवर नायजेरियन प्लेअर्सने नाव कोरत आपला वर्चस्व सिद्ध केलं. 

ओंकात ओतारी - वेटलिफ्टिंग - ब्राँझ
वेटलिफ्टिंगमध्येही भारतीय प्लेअर्स मेडल्सची लयलूट करत आहेत. महाराष्ट्राचा ओंकात ओतारीने वेटलिफ्टिंगमध्ये 69 किलो वजनी गटात ब्राँझ मेडल पटकावलय. 

राजविंदर कुमार – ज्युडो - ब्राँझ 
याखेरीज राजविंदर कुमारला हिनेदेखील ज्युडोमध्ये 78 किलो वजनी गटात ब्राँझ मेडलला गवसणी घातलीय. 

श्रेयसी सिंग – शूटींग - सिल्व्हर
भारताची शूटर श्रेयसी सिंगने डबल ट्रॅप प्रकारात सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय. 22वर्षीय श्रेयसीने 92 टार्गेट्सवर अचूक निशाना साधत दुसरा क्रमांक पटकावला. इंग्लंडच्या चार्लोट केरवुडने गोल्ड मेडल जिंकलं. तर ब्राँझ मेडलही इंग्लंडच्याच राचेल पॅरिशने जिंकत इंग्लंडचं वर्चस्व ठेवल. 

मोहम्मद असब – शूटींग - ब्राँझ
भारतीय शूटर्सचा कॉमनवेल्थ गेम्समध्ये विजयाचा धूमधडाका कायम आहे. भारताचा मोहम्मद असबने मेन्स डबल ट्रॅपमध्ये ब्राँझ मेडलची कमाई केलीय. माल्टाच्या 17 वर्षीय नॅथन झुरेबला पराभूत करत ब्राँझ मेडल पटकावल. 26 वर्षीय असबने 26 शॉट्सवर पॉईंट्सची कमाई केली. दरम्यान भारताचा अंकुर मित्तल पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.