नागपूरच्या चोरट्यांनी घातला क्रिकेटपटू प्रवीण कुमारला गंडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार याची 25 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेलीय. क्रिकेट मॅचसाठी नागपुरला आलेल्या प्रवीण कुमारला चोरट्यांनी चांगलाच गंडा घातला.

Updated: Nov 11, 2014, 07:03 PM IST
नागपूरच्या चोरट्यांनी घातला क्रिकेटपटू प्रवीण कुमारला गंडा title=

नागपूर: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार याची 25 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेलीय. क्रिकेट मॅचसाठी नागपुरला आलेल्या प्रवीण कुमारला चोरट्यांनी चांगलाच गंडा घातला.

नागपुरच्या व्हीसीए मैदानावर उत्तर प्रदेश विरूद्ध राजस्थान या मॅचसाठी प्रवीण कुमार नागपुरला आलाय. मॅचचा सराव करतांना त्यानं आपली चेन काढून ठेवली होती. प्रॅक्टिसनंतर तो परतला तेव्हा त्याला सोनसाखळी सापडली नाही. प्रवीण कुमारनं सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. ही सोनसाखळी 25 तोळ्यांची असून तब्बल आठ लाख किमतीची होती. 

याप्रकरणामुळं पुन्हा एकदा नागपूरच्या रस्त्यांवर होत असलेल्या चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांना पुन्हा वाटा फुटली आहे. यापूर्वी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या सासूबाईंचं मंगळसूत्र भर रस्त्यात चोरीला गेलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.