मुंबई : आईपीएल सीजन ९ मध्ये सनराइजर्स हैदराबाद विरोधात रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुचा खेळाडू सरफराज खानने त्याच्या धमाकेदार खेळीने अनेकांचे मन जिंकले. सरफराजने १० बॉलमध्ये ३५ रन्स केले. क्रिस गेल देखील मग याचं कौतूक करण्यास मागे नाही राहिला. त्याने म्हटलं की, 'सरफराज खूप छोटा आहे आणि माझ्या मुला सारखा आहे.'
गेल आणि सरफराज हॉटेलमध्ये एकच रुम शेअर करतात. गेल या युवा खेळाडूशी खूपच प्रभावित झाला आहे. गेल म्हणतो की, आम्ही आयपीएलनंतर ही संपर्कामध्ये असतो. याचं भविष्य खूप उज्वल आहे.
सरफराज खानने आईपीएल मध्ये खेळाणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तो अंडर-१९ चाही सदस्य होता. २००९ मध्ये हॅरिस शील्ड स्पर्धेत त्याने ५६ फोर आणि १२ सिक्स सहित ४२१ बॉलमध्ये ४३९ रन्स करत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडला होता. तेव्हा तो फक्त १२ वर्षाचा होता.
अंडर-१९ वर्ल्डकप मध्ये सरफराजने शानदार बॅटींग करत ४ अर्धशतकं लगावली होते. अंडर-19 क्रिकेट करिअरमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. २०१३ मध्ये त्याने १००० हून अधिक रन्स केले आहे.
Learning lessons @henrygayle pic.twitter.com/kM2VGF0f0c
— Sarfaraz Khan (@IamSarfarazKhan) February 12, 2016