क्रिस गेलनं केला विजय माल्ल्याबाबत खुलासा

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या टीममध्ये सहभागी झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन क्रिस गेलला टीमचा मालक विजय माल्ल्याच्या गोव्यातल्या बंगल्यामध्ये 5 दिवस राहायला मिळालं होतं.

Updated: Jun 13, 2016, 09:34 PM IST
क्रिस गेलनं केला विजय माल्ल्याबाबत खुलासा title=

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या टीममध्ये सहभागी झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन क्रिस गेलला टीमचा मालक विजय माल्ल्याच्या गोव्यातल्या बंगल्यामध्ये 5 दिवस राहायला मिळालं होतं. मी या बंगल्यामध्ये राजासारखा राहिलो आणि माल्ल्यांची हार्ले डेव्हिडसन चालवली असा खुलासा गेलनं त्याचं आत्मचरित्र 'सिक्स मशीन: आय डोन्ट लाईक क्रिकेट, आय लव्ह इट'मध्ये केला आहे. 

हा बंगला हॉटेलपेक्षाही मोठा आहे. जेम्स बॉन्ड आणि प्ले बॉयसारखा हा बंगला आहे. या बंगल्यामध्ये गेल्यावर पहिले मी स्विमिंग पूलमध्ये गेलो, त्यानंतर लॉनमध्ये जाऊन बियर प्यायली. किंगफिशर व्हिलामध्ये किंगफिशर बियरची अजिबात कमी नव्हती. असं गेल म्हणाला आहे. 

मी माल्ल्याच्या गोल्फ कोर्टवरही गेलो, असं गेल या आत्मचरित्रात म्हणाला आहे. मी तिथे राहत होतो तेव्हा राजा असल्याचं मला वाटत होतं. मी आयुष्यात कधीही मोटरबाईक चालवली नाही, पण माल्ल्याच्या बंगल्यात मला हार्ले डेव्हिडसनची तीन चाकी मोटरबाईक चालवायला मिळाली, असं गेल या पुस्तकात म्हणाला आहे.