बॉक्सर महंमद अलींवर उपचार सुरू

मुष्टियुद्ध खेळातील महान खेळाडू महंमद अली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, ही माहिती त्यांचे प्रवक्ते बॉब गुनेल यांनी दिलीय. न्यूमोनिया आजारामुळे त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले आहे. ते ७२ वर्षांचे आहेत.

Updated: Dec 21, 2014, 11:22 PM IST
बॉक्सर महंमद अलींवर उपचार सुरू title=

न्यूयॉर्क : मुष्टियुद्ध खेळातील महान खेळाडू महंमद अली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, ही माहिती त्यांचे प्रवक्ते बॉब गुनेल यांनी दिलीय. न्यूमोनिया आजारामुळे त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले आहे. ते ७२ वर्षांचे आहेत.

गुनेल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अली यांना सर्वोत्तम उपचार देण्यात येत आहेत. न्यूमोनियामुळे ते आजारी आहेत. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुष्टियुद्धमधील महान खेळाडू अली यांनी हेवीवेट चॅम्पीयन म्हणून ओळख आहे. अली यांनी ऑलिंपिकमध्ये मुष्टियुद्ध खेळात सुवर्णपदक मिळविलेले आहे.

गेली अनेक वर्षे अली पार्किन्सनने आजारी आहेत. अली यांच्या जीवनावर आधारित 'आय ऍम अली' या चित्रपटाचा खास प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. या 'शो'लादेखील ते उपस्थित राहू शकले नव्हते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.