बांगलादेशकडून आता बुमराह टार्गेट

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा टीम इंडियावर टीका सुरु झालीये. टीका करण्याचे कारण ठरलेय बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदवर घालण्यात आलेली बंदी. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमाराहला बांगलादेशकडून लक्ष्य बनवण्यात आलेय. 

Updated: Mar 22, 2016, 11:57 AM IST
बांगलादेशकडून आता बुमराह टार्गेट title=

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा टीम इंडियावर टीका सुरु झालीये. टीका करण्याचे कारण ठरलेय बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदवर घालण्यात आलेली बंदी. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमाराहला बांगलादेशकडून लक्ष्य बनवण्यात आलेय. 

बांगलादेशच्या तस्कीनने भारताविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. त्यावेळी रवी शास्त्रीने कॉमेंट्रीदरम्यान तस्कीनची गोलंदाजीची शैली चांगली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर दीड वर्षात आयसीसीने तस्कीनला निलंबित केलेय. त्याची गोलंदाजीची शैली संशयास्पद आढळल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आलीये. 

२३ मार्चला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात तस्कीन खेळू शकणार नाही. मात्र ही गोष्ट बांगलादेशच्या चाहत्यांना कशी सहन होईल. यासाठी त्यांनी आता बीसीसीआय तसेच बुमराहविरोधात टीका कऱण्यास सुरुवात केलीये. बीसीसीआयचीही खेळी असल्याचे बांगलादेशचे चाहते म्हणतायत. बुमराह आणि तस्कीन गोलंदाजी करत असल्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

दरम्यान, आयसीसीने तस्कीनवर ही बंदी घातलीये. या बंदीचा बीसीसीआयशी कोणताही संबंध नाही.