मुंबई : क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये बाचाबाची आपण नेहमी पाहिली आहे. पण सराव सत्रात आपल्या टीममधील दोन खेळाडू एकमेकांचे कपडे फाडताना तुम्ही कधी पाहिले नाही.
हो, हे खरं आहे. काही असं बुधवारी सराव सत्रात दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळताना जास्तच 'आक्रमक' झाले आहेत.
झाले असे...
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर नाथन ली आणि जेम्स पॅटीसन खेळताना अचानक मस्करी करताना एकमेकांना भिडले. ही मस्करी इतकी वाढली की ते एकमेकांच्या अंगावर धावून आले. इतपर्यंत ठीक होते पण दोघांनी एकमेंकाचे कपडे फाडले.
ही चांगली गोष्ट होती की, ही सर्व मस्करी होती. पण सराव सत्रात हे सर्व कॅमेऱ्यात कैद झाले.
इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ वन डे सामन्याची सिरीज येत्या ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सरावाचा हा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वेबसाइटवर टाकला आहे.
पाहा हा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.