अश्विननं किवींना चिरडलं, व्हाईटवॉशसाठी भारत सज्ज

इंदूर टेस्टवर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. न्यूझीलंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये 299 रन्सवर ऑल आऊट झाली आहे.

Updated: Oct 10, 2016, 05:31 PM IST
अश्विननं किवींना चिरडलं, व्हाईटवॉशसाठी भारत सज्ज title=

इंदूर : इंदूर टेस्टवर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. न्यूझीलंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये 299 रन्सवर ऑल आऊट झाली आहे. अश्विननं सर्वाधिक 6 विकेट्स घेत किवी टीमला चांगलाच दणका दिला, तर रविंद्र जाडेजानं दोन विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलनं 72 रन्स आणि निशामनं 71 रन्स करत थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. तिस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियानं बिनबाद 18 रन्सपर्यंत मजल मारली आहे.

या टेस्टमध्ये मजबूत स्थितीमध्ये असूनही भारताला मोठा धक्का बसला आहे. खांद्याला दुखापत झाल्यामुळे कमबॅक करणारा गौतम गंभीर सहा रनवर असताना रिटायर्ड हर्ट झाला.

भारताकडे आता 276 रन्सची भक्कम आघाडी आहे. आता न्यूझूलंडला मोठ टार्गेट देत कोहली अँड कंपनी तीन टेस्ट मॅचेसच्या सीरजमध्ये 3-0 नं निर्भेळ यश मिळवण्यास आतूर असेल.