बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलीये.

Updated: May 22, 2016, 10:50 AM IST
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर title=

नवी दिल्ली : भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलीये.

रविवारी झालेल्या बैठकीत अनुराग ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय. अनुराग ठाकूर बीसीसीआयचे युवा अध्यक्ष ठरलेत.

शशांक मनोहर यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्षपद रिक्त होते. त्या पदी आज झालेल्या बैठकीत अनुराग ठाकूर यांची निवड करण्यात आली.