विराट कोहलीचा आणखी एक विक्रम

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड.

Updated: Jan 20, 2016, 08:01 PM IST
विराट कोहलीचा आणखी एक विक्रम title=

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरोधात सलग दुसरं शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

विराट कोहलीने चौथ्या वनडेत ९२ बॉल मध्ये ११ फोर आणि १ सिक्सच्या मदतीने १०६ रन बनवत सलग दुसरी सेंचुरी ठोकली. त्यानंतर ब्रेट लीने त्याची खूपच प्रशंसा केली.

८४ बॉलमध्ये २५ वी सेंचुरी : 

विराटने फक्त ८४ बॉलमध्ये त्याच्या वनडे कारकिर्दीतली २५ वी सेंचुरी झळकावली. विराटने पर्थमध्ये ९७ बॉलमध्ये ९१ रन, ब्रिसबेनमध्ये ६७ बॉलमध्ये ५८ रन तर मेलबर्नमध्ये ११७ बॉलमध्ये ११७ रन केले होते. 

सचिन आणि पाँटिंगला टाकलं मागे :

विराटने वनडेत २५ व्या सेंचुरी झळकवण्यासाठी सचिन आणि पाँटिंग पेक्षाही कमी इनिंग घेतल्या आहेत. कोहलीने १६२ इनिंगमध्ये २५ शतक झळकावले. सचिनने त्यासाठी २३४ तर पाँटिंगने २७९ इनिंग घेतल्या होत्या. 

ऑस्ट्रेलियात शतक :

ऑस्ट्रेलियात शतक ठोकणाऱ्या मोठ्या मोठ्या खेळांडूमध्ये विराटचंही नाव जोडलं गेले आहे. जॅक हॉब्स, डेविड गॉवर आणि विराटच्या नावावर ऑस्ट्रेलियामध्ये ९ सेंचुरी ठोकण्याचा रेकॉर्ड आहे.

सर्वाधिक वनडे सेंचुरी : 

कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत २५ शतक करण्याचा रेकॉर्ड केला आहे. सर्वाधिक सेंचुरी ठोकणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. 

सचिन तेंडुलकर - ४९
रिकी पाँटिंग - ३०
सनथ जैसुर्या - २८ 
विराट कोहली - २५