अमित मिश्राने आर. अश्विनलाही टाकले मागे

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. या विजयासह अनेक रेकॉर्डही या सामन्यात प्रस्थापित झाले.

Updated: Oct 17, 2016, 02:16 PM IST
अमित मिश्राने आर. अश्विनलाही टाकले मागे title=

धरमशाला : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. या विजयासह अनेक रेकॉर्डही या सामन्यात प्रस्थापित झाले.

भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने पहिल्या सामन्यात तीन विकेट घेत नव्या रेकॉर्डला गवसणी घातली. त्याने ब्रेसवेलला बाद केल्यानंतर सर्वाधिक जलद गतीने 50 विकेट मिळवण्याचा रेकॉर्ड केला. याआधी हा रेकॉर्ड आर. अश्विनच्या नावावर होता. 

अश्विनने 34 सामन्यांत ही किमया साधली तर अमित मिश्राने केवळ 32 सामन्यात हा पराक्रम केला. या यादीत अव्वल स्थान आहे ते अजित आगरकरचे 
आगरकरने अवघ्या २३ सामन्यांत ५० विकेट्स घेण्याची किमया साधली होती.