भारतीय बॉक्सिंगपटू सरिता देवीवर निलंबनाची कारवाई

भारतीय बॉक्सर सरिता देवीसह तिच्या तीन कोचेसवर इंटरनॅशनल बॉक्सिंग एसोसिएशनने अनिश्चित काळासाठी बंदी लादली आहे. एशियन गेम्समध्ये सरिताने पंचांच्या निर्णयाविरोधात मेडल सेरेमनी दरम्यान मेडल घेण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.

BGR | Updated: Oct 22, 2014, 03:41 PM IST
भारतीय बॉक्सिंगपटू सरिता देवीवर निलंबनाची कारवाई title=

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सर सरिता देवीसह तिच्या तीन कोचेसवर इंटरनॅशनल बॉक्सिंग एसोसिएशनने अनिश्चित काळासाठी बंदी लादली आहे. एशियन गेम्समध्ये सरिताने पंचांच्या निर्णयाविरोधात मेडल सेरेमनी दरम्यान मेडल घेण्यास नकार दिल्यामुळे तिच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.

तिच्यावर बंदी लादण्यात आल्याने आगामी महिन्यात होणा-या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपला तिला मुकाव लागणार आहे. सरिताने ज्याप्रकारे निषेध नोंदवला तो योजनाबद्ध असल्याचं इंटरनॅशनल बॉक्सिंग एसोसिएशनने म्हटलं आहे.  

आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमधील ६० किलो गटात सरिता देवीची दक्षिण कोरियाच्या जिना पार्कशी लढत होती. या लढतीमध्ये पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे जिना पार्क विजयी झाली. सरिता देवी यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सरिता देवीने पदक प्रदान सोहळ्यात पाणावलेल्या डोळ्यांनी कांस्य पदक स्वीकारण्यास नकार दिला व ते पदक दक्षिण कोरियाच्या जिना पार्ककडे  देऊन तिथून निघून गेली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.