अभिनव बिंद्राचे मेडल हुकले

  रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या गोल्डमन अभिनव बिंद्राला मेडलने हुलकावणी दिली. 

Updated: Aug 8, 2016, 09:09 PM IST
अभिनव बिंद्राचे मेडल हुकले  title=

रिओ :   रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या गोल्डमन अभिनव बिंद्राला मेडलने हुलकावणी दिली. 

अभिनव बिंद्राने फायनलमध्ये सातव्या राउंडपर्यंत धडक मारली पण सातव्या राऊंडमध्ये युक्रेनच्या शुटरची आणि अभिनवची बरोबरी झाली. दोघांचेही १६३. ८ गुण झाले होते. 
त्यानंतर शूट आउट झाला. त्यात अभिनव बिंद्राने १० गुण मिळवले तर प्रतिस्पर्धी १०.५ गुण मिळवत आगेकुच केली. 

अभिनवने सातव्या स्थानापासून पाचव्या स्थानावर धडक मारली. त्यानंतर तो दुसऱ्या स्थानापर्यंत वर गेला होता. पण अखेरच्या क्षणी त्याला आश्वासक कामगिरी करता आली नाही.