मुंबई: मुंबईच्या अंडर-१४ टीममध्ये समावेश न झाल्यानंतर नऊ वर्षीय डावखुरा गोलंदाज मुशीर खानने नवा कारनामा केला आहे. आझाद मैदानामध्ये दादर युनियन माटुंगाच्या वतीने खेळतांना मुशीरने १४ ओव्हर्समध्ये नऊ रन देत नऊ विकेट पटकावल्या.
मुशीर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरूकडून खेळणारा सरफराज खानचा छोटा भाऊ आहे. मुशीरने पहिली फलंदाजी करतांना टीमसाठी ४८ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना नऊ धावा देत नऊ विकेट काढल्या.
अंडर-१४ मध्ये निवड न झालेल्या मुशीरने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शानने निवडकर्त्यांना चांगलच उत्तर दिलं आहे. मुशीरच्या कामगिरीच्या जोरावर विरारच्या टीमला ३४ धावांमध्ये गुंडाळण्यात दादर युनियन माटुंगा टीमला यश आलं. दादर युनियन टीमने २३९ धावाचं आव्हान विरारसमोर ठेवलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.