मेलबर्न : स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला क्रिस गेल याने आणखी एक स्फोटक खेळी केली आहे. या स्फोटक खेळीसोबत त्याने युवराज सिंग याच्या ८ वर्षा अगोदरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत असताना एडिलेट स्ट्राईकर्सच्या विरोधात त्याने हा रेकॉर्ड केला आहे. आधीच्या ओव्हरमध्ये शेवट्या ४ बॉलमध्ये गेलन ४ सिक्स तर नंतरच्या ओव्हरमध्ये पुन्हा एक सिक्स लगावला. गेलने फक्त १२ बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं.
गेलने इनिंगमध्ये २ चौके आणि ७ सिक्सच्या मदतीने १७ बॉलमध्ये ५६ रन्स केलेत. युवराज सिंगने पहिल्या टी-२० विश्व चॅंपियनशिपमध्ये १९ सप्टेंबर २००७ रोजी इंग्लडच्या विरोधात १२ बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. ज्यामध्ये त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये युवीने ६ सिक्स मारले होते.
गेलचं अर्धशतक - 12 बॉल - 0,2,6,6,6,6, 2,6,6,4,1,6
युवराजचं अर्धशतक -12 बॉल - 0,4,1,4,4,1, 6,6,6,6,6,6
युवराजचं अर्धशतक