भारत- इंग्लंड तिसरी वन-डे आज रंगणार

नोटिंघममध्ये आज भारत आणि इंग्लंड याच्यात तिसरी वन-डे रंगणार आहे. दुसरी वन-डे जिंकून भारताने सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतलीय. तिसरी वन-डे जिंकून सीरिज जिंकण्याचा विश्वास कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केलाय. दरम्यान, रोहित शर्मा संघात नसण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 30, 2014, 10:31 AM IST
भारत- इंग्लंड तिसरी वन-डे आज रंगणार title=

इंग्लंड : नोटिंघममध्ये आज भारत आणि इंग्लंड याच्यात तिसरी वन-डे रंगणार आहे. दुसरी वन-डे जिंकून भारताने सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतलीय. तिसरी वन-डे जिंकून सीरिज जिंकण्याचा विश्वास कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केलाय. दरम्यान, रोहित शर्मा संघात नसण्याची शक्यता आहे.

कार्डिफला अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माला दुखापत झाली असून, त्याच्या मधल्या बोटाला फ्रॅक्‍चर झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. दुसरा सामना खेळताना रोहितने झेल पकडण्याचा केलेला प्रयत्न फसला आणि चेंडू त्याच्या बोटावर जोराने आदळला होता. तर कार्डिफ सामन्यातील विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी टीमला शांत राहायचा सल्ला देत आहे. एका सामन्यातील यशाने हरखून जायला नको हेच त्याचे म्हणणे आहे.

रोहित शर्मा ऐवजी निवड समितीने मुरली विजयला बदली खेळाडू म्हणून पाठवले आहे. तिसऱ्या सामन्यात रोहितची सलामीची जागा रहाणेला देऊन चौथ्या क्रमांकावर अंबाती रायडू खेळायची शक्‍यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.