सचिननंतर या पठ्ठ्यानं तोडलाय आयपीएलचाही रेकॉर्ड!

आयपीएल 2015 च्या लिलावात युवराज सिंहनं पुन्हा एकदा कमाईचा नवा रेकॉर्ड बनवलाय. पण, याच दरम्यान आणखी एका खेळाडूनं एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Updated: Feb 18, 2015, 05:50 PM IST
सचिननंतर या पठ्ठ्यानं तोडलाय आयपीएलचाही रेकॉर्ड! title=

नवी दिल्ली : आयपीएल 2015 च्या लिलावात युवराज सिंहनं पुन्हा एकदा कमाईचा नवा रेकॉर्ड बनवलाय. पण, याच दरम्यान आणखी एका खेळाडूनं एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

हा नवा रेकॉर्ड लिलावाच्या रकमेचा नाही तर या खेळाडूच्या वयाचा आहे... आणि हा रेकॉर्ड कायम केलाय मुंबईच्या 17 वर्षीय सरफराज खाननं... 

सरफराजनं आयपीएल टीमममध्ये स्थान मिळवत आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून आपल्या नावाची नोंद केलीय. सरफराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 50 लाख रुपयांत खरेदी केलंय. 

15 वर्षांचा असतानाच सरफराजनं 439 रन्स बनवून सचिन तेंडुलकरचा हॅरिस शिल्ड क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक रन्स बनवण्याचा रेकॉर्ड तोडला होता... आता आयपीएलचा रेकॉर्ड बनवणाऱ्या सरफराजच्या करिअरसाठी ही आणखी एक संधी ठरलीय.

आपल्याला आयपीएलद्वारे मिळणाऱ्या पैशांचं प्लानिंगही सरफराजनं आत्तापासूनच करून ठेवलंय. सरफराजला आपल्या वडिलांना एक कार गिफ्ट करायचीय. सरफराजच्या वडिलांचं 2010 मध्ये अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती... या हाताचं ऑपरेशनही करायचंय... असं सरफराजनं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.