'बीग बॉस'मध्ये भाग घेऊन चूक केली - रतन

‘बिग बॉस’च्या यंदाच्या सातव्या पर्वातून नुकतीच बाहेर पडलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रतन राजपूतनं आपण ‘बीग बॉसमध्ये भाग घेऊन चूक केली’ अशी भावना व्यक्त केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 13, 2013, 06:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘बिग बॉस’च्या यंदाच्या सातव्या पर्वातून नुकतीच बाहेर पडलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रतन राजपूतनं आपण ‘बीग बॉसमध्ये भाग घेऊन चूक केली’ अशी भावना व्यक्त केलीय.
रिअॅलिटी शो ‘बीग बॉस’मधून बाहेर पडणारी रतन चौथी स्पर्धक आहे. २८ दिवसानंतर बीग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या रतननं ‘घरातून बाहेर पडल्यानंतर शांतता लाभलीय... तिथं सुरू असलेल्या आपापसांतील राजकारणामुळे राहणंही कठिण झालं होतं’ असं म्हटलंय.
‘मला स्वत:वर पूर्ण विश्वास होता पण बिग बॉसच्या घरात राहून या कपटी लोकांसोबत राहणं तितकं सोप्प नाही आणि त्यांच्या राजकारणात सहभागी होणंही शक्य नाही हे चांगलंच कळलंय’ असंही रतननं म्हटलंय.
यावेळी, रतननं नाव न घेता 'बीग बॉस'मधील इतर स्पर्धकांवरही टीका केली. ‘इथं आलेल्या काही जणांना (मला नाव घ्यायचं नाहीए) वाटतं की आपण फिल्मी घरांतून आलोय म्हणून आपण इथं खास आहोत... एका पद्धतीची वर्ग व्यवस्था त्यांनी इथं तयार केलीय… पण, माझा विश्वास आहे की इतं सर्व जण समान आहेत कारण सगळेच एका कार्यक्रमाचा भाग आहेत. हे काही बीग ब्रदर नाही...’ असं ती म्हणतेय.

`बीग बॉस`च्या घरात अनेकांशी वाद झाला असला तरी रतन मात्र खूश आहे. आपल्याला कुणीही वाईट वर्तवणूक दिली नाही, असं ती म्हटतेय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.