‘केबीसी’च्या ऑनलाईन खेळाला भरभरून प्रतिसाद

मुंबईतीलेच नाही तर संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं स्वप्न असतं की, एकदा तरी अमिताभ बच्चन बरोबर गप्पा माराव्यात. बहुतेक लोकांचं हे स्वप्न केबीसीच्या माध्यमातून पूर्ण होतं. त्यामुळं लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याशी बोलण्याची संधी मिळते.

Updated: Dec 3, 2013, 06:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतीलेच नाही तर संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं स्वप्न असतं की, एकदा तरी अमिताभ बच्चन बरोबर गप्पा माराव्यात. बहुतेक लोकांचं हे स्वप्न केबीसीच्या माध्यमातून पूर्ण होतं. त्यामुळं लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याशी बोलण्याची संधी मिळते.
आता तुम्हाला ही बिग बींसोबत केबीसी खेळण्याची संधी, त्यांच्याबरोबर गप्पा मारत प्रश्नांची उत्तर देण्याची तसंच त्यांच्याकडून त्यांची सही केलेला चेक मिळवून करोडपती बनण्याची संधी मिळू शकते. पण हॉट सीटवर बसायची संधी मिळाली तरी तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता का? ‘फास्टेस्ट फिंगर’ कमीतकमी वेळात योग्य उत्तर देऊन कसं जिंकणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं स्वता: सोनी कंपनीनं दिलंय.

आता ‘कौन बनेगा करोडपती’च्या ऑनलाईन खेळावर तुम्ही प्रत्यक्ष तालीम करु शकतात हॉट सीटवर बसून. या महाउपयोगामुळंच केबीसीचा ऑनलाइन खेळ हा तीन महिन्यात ४० लाख वेळा खेळला गेला आहे. `केबीसी`चा प्रश्नोत्तरांचा खेळ खेळणाऱ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या ऑनलाईन खेळाची निर्मिती केली आहे.
केबीसी हा प्रचंड असा लोकप्रिय खेळ आहे. तसंच त्यामध्ये सहभाग घेणाऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. पण त्या खेळाचे भाग हे मर्यादी स्वरुपात असल्यामुळं सर्व स्पर्धक भाग घेऊ शकत नाही, असं `सोनी एंटरटेन्मेंट`च्या `न्यू मीडिया`चे उपाध्यक्ष नितेश कृपलानी यांनी सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.