www.24taas.com, पीटीआय, मुंबई
टीव्ही अभिनेता कुशल टंडननं ‘बिग बॉस-७’चा होस्ट सलमान खान हा तनिषा मुखर्जीच्या बाबतीत भेदभाव करतो, असं म्हटलंय. कुशल मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरातून आऊट झाला.
२९ वर्षीय कुशलला बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आलं. कारण त्यानं घरातील सदस्य अँडीसोबत शिवीगाळ आणि अयोग्य वागणूक केली. मात्र आपल्या वागण्याचं समर्थन करत कुशल म्हणाला मी नेहमी आपल्या मित्रांच्या बाजूनं उभं राहिलो, मी काही चुकीचं वागलो असं मला वाटत नाही.
मी सलमान खानचा खूप मोठा फॅन आहे. मला त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी त्याच्या भावना समजू शकतो. सलमान माझ्यासारखाच इमोशनल आहे. पण तो तनिषाच्या बाजूनं झुकलेला असतो, मी काहीही चुकीचं केलं नाही, असं स्पष्टीकरण आऊट झाल्यानंतर कुशलनं दिलं.
यापूर्वी सलमान खाननं कुशलवर परखड शब्दात टीका केली होती. मागील आठवड्यात एका टास्क दरम्यान कुशल आणि तनिषात वाद झाला होता आणि त्यातून त्यांचं झालेलं भांडण, कुशलचं वागणं अशोभनिय होतं.
कुशल पुढं म्हणाला, मी अँडी सोबत भांडलो कारण त्यानं घरातील महिला गोहर खान आणि प्रत्युषा बॅनर्जी यांचा अपमान केला होता. जेव्हा कोणी माझ्या मित्रांबद्दल वाईट बोलतं तेव्हा मला खूप राग येतो. अँडीनं तर गोहर आणि प्रत्युषाच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं. गोहर आणि कुशलच्या नात्याबद्दल त्याला विचारलं असता कुशल म्हणाला, गोहर शोनंतरही गोहर माझी आयुष्यभराची मैत्रिण आहे. ती सुद्धा शो माझ्यासोबत सोडायला तयार होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.