www.24taas.com, मुंबई
बॉ़लीवूडच्या मुन्नाभाईला आता तुरुंगात जावं लागणार आहे..सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय...संजय दत्तने यापूर्वीच १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे..पण आता त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे...संजय दत्त सध्या जामिनावर आहे..खरं तर टाडा कोर्टाने त्याला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती..मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा एका वर्षाने कमी करुन ती पाच वर्ष केलीय...आता चार आठवड्यात संजय दत्तला कोर्टासमोर शरण जावं लागणार आहे....पण हे सगळ प्रकरण आहे तर काय? १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तने नेमकी कोणती भूमिका बजावली होती?त्याला या प्रकरणात कधी अटक झाली होती? १९९३ ते २०१३ या दरम्यान संजय दत्तच्या प्रकरणात नेमकं काय घडलं? हे सगळं काही तुम्ही पहाणार आहात नायक ते खलनायक मध्ये ...
बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी अभिनेता संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावलीय...टाडा कोर्टाने त्याला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती..मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा एका वर्षाने कमी केलीय..
1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील अपीलांवर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला...बॉलीवूडसह सा-या देशाचं लक्ष्य लागलं होतं ते अभिनेता संजय दत्तच्या निकालाकडं...संजू बाबाचं काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती... बेदायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी टाडा कोर्टाने संजय दत्तला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती...सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तची शिक्षा सहा ऐवजी ५ वर्ष केलीय...त्यामुळे आता संजय दत्तला तुरुंगात जावं लागणार हे निश्चित झालंय...याप्रकरणी संजय दत्तने १८ महिने तुरुंगात काढले असून आता त्याला उरलेले ४२ महिने अर्थात साडेतीन वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे....संजय दत्तला शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आलीय..
३१ जुलै २००७ मध्ये टाडा कोर्टाने संजय दत्तच्या प्रकरणाता फैसला सुनावला होता.. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी टाडा कोर्टाने संजय दत्तला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती...
मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली १९ एप्रिल १९९३ला मुंबई पोलिसांनी संजय दत्तला अटक केली होती..पण कटाच्या आरोपातून टाडा कोर्टाने त्याची सुटका केली होती..बॉ़म्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून संजय दत्तची सुटाक झाली खरी पण बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला टाडा कोर्टाने दोषी ठरवून सहा वर्षाची शिक्षा ठोठावली...आणि आज सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा एक वर्षाने कमी करुन पाच वर्षाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं....त्यामुळे रुपेरी पडद्यावर गांधीगिरी करणा-या संजू बाबाला आता तुरुंगाच्या चार भिंतीआड साडेतीन वर्ष घालवाली लागणार आहेत..
संजय दत्तला आता तुरुंगात जावं लागणार आहे...पण ज्या प्रकरणासाठी त्याला शिक्षा झालीय...त्यामध्ये संजय दत्तची नेमकी कोणती भूमिका होती..पोलिसांनी त्याच्यावर कोणते आरोप ठेवले होते..
१२ मार्च १९९३ला साखळी बॉम्बस्फोट मालिकेनं मुंबई शहर अक्षरश: हादरुन गेलं होतं...देशाने पहिल्यांदाच भीषण बॉम्बस्फोटाचा अनुभव घेतला होता...या घटनेनंतर मुंबई पोलीसांनी वेगाने तपास सुरु केला...आणि तपासादरम्यान बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचं नाव पुढं आलं...मॅग्नम व्हिडिओ कंपनीचा मालक समीर हिंगोरा आणि हनिफ कडावाला यांच्या चौकशीत संजय दत्तच्या नावाचा खुलासा झाला होता..
बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तवर आरोप झाल्यामुळे बॉलीवूडमध्ये भूकंप आला होता....त्यावेळी संजय दत्त मॉरिशसमध्ये अतिष नावाच्या सिनेमाच्या शुटिंगसाठी गेला होता....ते शुटिंग मध्येच थांबवून संजय दत्तला चौकशीसाठी मुंबईला पाचारण करण्यात आलं...संजय दत्त मुंबई विमातळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली...पोलिसांनी त्याच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्याने गँगस्टर अबू सालेम , समीर हिंगोरा आणि हनिफ कडावाला हे तिघेजण आपल्या घरी आल्याची कबुली संजय दत्तने दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता....कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मुंबई बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचं तोपर्यंत उघड झालं होतं आणि संजय दत्तच्या घरी आलेले समीर हिंगोरा आणि हनिफ कडावाला तिघेजण दाऊदचे विश्वासू साथिदार होते...त्यामुळे संजय दत्तवर संशय वाढला...१६ जानेवारी १९९३ला समीर हिंगोरा , हनिफ कडावाला आणि बाबा चौहान या तिघ्यांनी तीन एके ५६ रायफल, ९ एमएम पिस्तूल , काडतूस तसेच काही हँडग्रेनेड संजयकडं दिली होती...मात्र पुढे एक एके५६ रायफल आणि ९ एमएम पिस्त