संजय दत्तला शिक्षा, बॉलिवूडला जबर झटका

अभिनेता संजय दत्त याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. गेली वीस वर्षे हा खटला सुरू होता.

Updated: Mar 21, 2013, 02:08 PM IST

www.24taas.com, मुंबई
अभिनेता संजय दत्त याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. गेली वीस वर्षे हा खटला सुरू होता. संजय दत्तला सुनावलेल्या शिक्षेनंतर बॉलिवूड मात्र चांगलचं हादरलं आहे. कारण की, संजय दत्त याचे बरेचसे सिनेमे हे अपूर्णावस्थेत आहेत. आणि त्यामुळे बॉलिवूडच्या बऱ्याचसा दिग्दर्शकांना मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडचे जवळपास २५० कोटी रुपये संजय दत्तवर लागले आहेत. सध्या संजूबाबाकडे पी. के., पोलिसगिरी आणि उंगली या तीन फिल्म्स आहेत. त्यापैकी राज कुमार हिरानीची `पी.के.` ही फिल्म जवळपास ५० टक्के पूर्ण झाली आहे. `पोलिसगिरी` ही फिल्म जवळपास ८० टक्के पूर्ण झाली आहे.

करण जोहर होम प्रॉडक्शनची `उंगली` ही फिल्म फक्त ३० टक्केच पूर्ण झाली आहे. एवढचं नाही तर बहुचर्चित मुन्नाभाईच्या सिरीजमधली `मुन्नाभाई चले दिल्ली` या सिनेमाची घोषणाही नुकतीच करण्यात आली आहे.