www.24taas.com, सिडनी
मी ज्यांच्या विरोधात क्रिकेट खेळलो त्यातील सचिन तेंडुलकर हा सर्वात महान खेळाडू असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या निवृत्तीच्या वेळी सांगितले. पर्थ ही आपली अखेरची कसोटी खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंगने सोमवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली.
यावेळी त्याला त्याच्या काळातील सर्वात श्रेष्ठ खेळाडूबद्दल विचारण्यात आले त्यावेळी रिकी पाँटिंगने सांगितले की, मला वाटते की सचिन सर्वात महान फलंदाज आहे. सचिनने ऑस्ट्रेलियामध्ये चांगले क्रिकेट खेळले आहे.
पाँटिंगने १६८ कसोटी सामन्यानंतर क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. या सामन्यांमध्ये त्याने ५१.८५ च्या सरासरीने १३,३७८ धावा काढल्या, यात ४१ शतक आणि ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. पाँटिंगने ३७५ वन डे सामनेही खेळले आहे. वन डे सामन्यातही त्याने १३७०४ धावा काढल्या आहे. यात त्याचे ३० शतक समाविष्ठ आहे.