सचिनने आत्ममंथन करावे- अक्रम

www.24taas.com, नवी दिल्ली सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला निवृत्ती घे, असे सांगणे निवडकर्त्यांना कठीण आहे. परंतु, या महान खेळाडूने या संदर्भात स्वतः निर्णय घेणे गरजेचे आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 12, 2012, 04:31 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला निवृत्ती घे, असे सांगणे निवडकर्त्यांना कठीण आहे. परंतु, या महान खेळाडूने या संदर्भात स्वतः निर्णय घेणे गरजेचे आहे. त्याने आत्ममंथन करण्याची गरज असल्याचे मत पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे.
तुमचा सर्वात अनुभवी फलंदाज दोन वर्षांपासून शतक नाही झळकावत तर प्रश्न उपस्थित होणारच असे अक्रम यांनी सांगितले. सचिनने आत्ममंथन केले पाहिजे, जसे रिकी पाँटिंग याने केले. एका क्रीडा वाहिनीशी बोलताना अक्रम म्हणाला, प्रश्न हा आहे की मांजराच्या गळ्या घंटी कोण बांधणार? सचिनला हे कोण सांगणार की तू निवृत्ती घे. माजी क्रिकेटरांनी धोनीला बाहेर बसविण्याचे म्हटले आहे. पण सचिनला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो का? असे अनेक प्रश्न अक्रमने उपस्थित केले आहे.

सौरवसह अनेकांना वाटते की त्याने निवृत्ती घ्यावी. परंतु, सचिनला आणखी सहा महिने खेळण्याची इच्छा आहे. सचिन सारख्या महान खेळाडूला सल्ला देणे कठीण आहे. सचिनने आपल्या भविष्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली तर निवड समितीला योग्य पर्याय शोधणे सहज जाणार आहे.
अक्रम म्हटला तो जर सचिनच्या जागेवर असता तर त्याने आतापर्यंत निवृत्ती घेतली असती. कारण सचिनकडे आता काही मिळविण्यासारखे राहिलेच नाही आहे.