सचिनच्या निवृत्तीची आतली बातमी

सचिनला पाकिस्तानविरूद्ध हा विक्रम करण्याची संधी होती... तरीही सचिनने हा निर्णय का घेतला याचं उत्तर प्रत्येकाला हवं आहे... आम्ही सांगतो सचिनच्या वन-डे निवृत्तीची इनसाईड स्टोरी

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 24, 2012, 06:52 PM IST

www.24taas.com, मुंबई
विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन-डेत... सेंच्युरीच्या हाफ सेंच्युरीच्या उंबरठ्यावर असताना केलेली निवृत्तीची घोषणा सर्वांनाच बुचकळ्यात पाडणारी आहे... सचिनला पाकिस्तानविरूद्ध हा विक्रम करण्याची संधी होती... तरीही सचिनने हा निर्णय का घेतला याचं उत्तर प्रत्येकाला हवं आहे... आम्ही सांगतो सचिनच्या वन-डे निवृत्तीची इनसाईड स्टोरी
सेंच्युरीजच्या हाफ सेंच्युरीपासून केवळ एक सेंच्युरी दूर... तरीही सचिनने आपल्या या धडाकेबाज करिअरला इतक्या लवकर का लावला फुलस्टॉप..?
सचिनच्या निवृत्तीची इनसाईड स्टोरी
मैदानावर सचिन रन्ससाठी धडपडत होता... बॅटमधून रन्सचा ओघही आटला होता... सतत सचिनची दांडी गुल होत होती... स्वत: मास्टरलाही होती चिंता... सचिनवरही होता दबाव कारण कोट्यावधी भारतीय फॅन्सच्या असलेल्या अपेक्षा सचिन पूर्ण करण्यात अपयशी ठरत होता...
सचिनला सारखा एकच प्रश्न विचारला जात होता की क्रिकेटमधून तो कधी निवृत्त होणार ?
आणि आली नागपूर टेस्ट... आवडत्या मैदानावर केवळ सचिनच नाही तर टीम इंडियाही संधीचा फायदा उचलण्यात अपयशी ठरली.. आणि भारताच्या पदरी पडला पुन्हा एक पराभव...
या लाजिरवाण्या पराभवानंतर सचिन शोकमग्न होता... . घरी परतल्यानंतर सचिन तब्बल 3 दिवस जगाच्या नजरेपासून दूर होता... मोबाईल फोनही स्विच ऑफ केला होता... सचिनशी संपर्क साधण्याचा केवळ एकच पर्याय होता...सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर.... आणि शुक्रवारी रात्री सचिनने आपल्या कुटुंबाला आणि जवळच्या मित्रांना मोठ्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत कल्पना दिली... आणि तो निर्णय होता वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा....

आता वेळ होती बीसीसीआयला आपल्या या निर्णयाची माहिती देण्याची... ती ही अशावेळी जेव्हा पाकिस्तानविरूद्ध वन-डे सीरिजकरता टीम इंडियाची निवड करण्यात येणार होती... मास्टरने बोर्ड अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना फोन केला... श्रीनिवासन यांनी सचिनचा निर्णय बदलण्याचा प्रयत्नही केला.. मात्र मास्टरने निर्णय घेतला होता...महत्वाचं म्हणजे सचिनच्या निवृत्तीचा निर्णय अगोदर घेतला असल्याचा दुजोरा म्हणजे सचिन पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजपूर्वी कुटुंबातील सदस्यांसह मसूरीला गेला असल्याचं त्याच्या जवळच्या सहका-यांना माहित होतं....
सचिनच्या आयुष्यातल्या या मोठ्या निर्णयात पत्नी अंजली, मोठा भाऊ अजित आणि कोच रमाकांत आचरेकर यांचीही संमती होती... म्हणजे जवळपास 72 तासांच्या आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन-डे क्रिकेटला अलविदा करण्याचा कठीण निर्णय घेतला होता.
वन-डे क्रिकेटमधील सर्वात मोठा रनवीर आणि शतकवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात खेळताना दिसणार तो केवळ पांढ-या कपड्यात...