सचिन तेंडुलकर आता पाठ्यपुस्तकात

क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झालेला सचिन तेंडुलकर आता लवकरच पाठ्यपुस्तकांमध्ये पदार्पण करणार आहे. शालेय अभ्यासक्रमात सचिनच्या धड्याचा समावेश करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही माहिती दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 19, 2013, 11:43 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झालेला सचिन तेंडुलकर आता लवकरच पाठ्यपुस्तकांमध्ये पदार्पण करणार आहे. शालेय अभ्यासक्रमात सचिनच्या धड्याचा समावेश करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी ही माहिती दिली.
क्रिकेटमधून निवृत्ती आणि भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सध्या देशात सचिनची लाट आहे. यावर स्वार होत राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कठोर मेहनत आणि परिश्रमांचं मूर्तीमंत उदाहरण असलेल्या सचिनच्या यशाची गाथा आता शालेय विद्यार्थ्यांना गिरवता येणार आहे.
दरम्यान, भारतरत्न सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानलं जायचं. परंतु सचिन आता खरोखरचाच देव बनलाय. बडोद्याच्या स्वामी नारायण मंदिरामध्ये भगवान स्वामी नारायण यांच्या मूर्तीला भक्तांनी चक्क सचिन तेंडुलकरचे रूप दिले. मूर्तीला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसारखे टी शर्ट घालून, हेल्मेट आणि पॅडही बांधण्यात आले.
भगवान स्वामी नारायण यांच्या मूर्तीला एखाद्या संसारिक व्यक्तीचे रूप देण्यात आल्याची ही अशाप्रकारची पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे या सचिनरूपी स्वामींची यावेळी विधीवत पूजाअर्चाही करण्यात आली. करोडो क्रिकेटरसिकांच्या हृदयात जिव्हाळ्याचे स्थान असलेल्या सचिन तेंडुलकरला देवत्व प्राप्त झाल्याचे हे बोलके उदाहरण आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.