सुशीलकुमार शिंदे तर राजकारणातील शशी कपूर- राज

‘सुशीलकुमार शिंदे म्हणजे राजकारणातील शशी कपूर सतत एकच, मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं एकच तुणतुणं सुरू…

Updated: Feb 23, 2013, 07:51 AM IST

www.24taas.com, सोलापूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत अजित पवारांनंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही टीका केली. राज ठाकरेंनी सोलापूर मध्ये म्हणजेच सुशीलकुमार शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. ‘सुशीलकुमार शिंदे म्हणजे राजकारणातील शशी कपूर सतत एकच, मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं एकच तुणतुणं सुरू… मला सोनिया मॅडमनी हे दिलं, एक दलित असूनही मला त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर नेलं अहो सुशीलकुमार तुम्ही काय केलं दलित बांधवासाठी?’ असं म्हणत त्यांनी सुशीलकुमारांनाही चांगलेच धारेवर धरले...

‘त्या दिल्ली रेप प्रकरणातील त्यांना प्रश्न विचारलं तरी तेच मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं अरे काय प्रश्न विचारला तुम्हांला उत्तर काय देतायेत...’ असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांची नक्कल करीत त्यांची खिल्ली देखील उडवली.... तर दुसरीकडे सोलापूर शहराबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.. ‘आज मला सांगितलं शहरात फक्त ६ सिग्नल सुरू आहे, याला काय शहर म्हणायचं?’ या शहरासाठी काय केलं सुशीलकुमारांनी असा सवालही त्यांनी त्यांना विचारला...
तर त्याचबरोबर त्यांनी गुजरातचं ही उदाहरण दिलं, ‘गुजरात मधील कच्छच्या रणमध्येही गेलो असता तिथंही पाण्याचे जे काही नियोजन केलयं त्याला तोड नाही.’ असं म्हणतचं त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा तारीफ केली. तर दुसरी त्यांनी आपल्या मंत्र्यांनाही चांगलाच टोमणा हाणला... ‘आपल्या मंत्र्यांना एकच सांगणं आहे, की मोदी जे रोज सकाळी अंघोळ करतात ना, त्याचे दोन - दोन चमचे पाणी प्या जरा. बरं आंघोळीचचं पाणी म्हटलं, दुसरं नाही म्हंटलो काही...’ असं म्हणत राज ठाकरें सोलापूर सभेत चांगलीच फटकेबाजी केली....