www.24taas.com, चंद्रपूर
राज्यव्यापी दौ-यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज दोन दिवसाच्या मुक्कामासाठी चंद्रपूर शहरात आगमन झालं. विदर्भ दौ-याला चंद्रपूरपासून सुरुवात होणारेय.
या दोन दिवसात राज ठाकरे पदाधिका-यांची आढावा बैठक घेणारेत. आपल्या याआधीच्या चार सभांमध्ये राज ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि अजित पवारांवर सडकून टीका केली होती. त्यामुळे आता विदर्भ दौ-यात नक्की काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.
राज विदर्भाचा १० दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. यावेळी राज विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा काढणार असले तरीही, या दरम्यान ते फक्त एकच जाहीर सभा घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे आपल्या दौऱ्यात राज ठाकरे भंडारा जिल्ह्यातील एकाच घरातील तीन अल्पवयीन बहिणींची हत्या झालेल्या मुरमाडी गावाला भेट देणार आहेत.