www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या प्रकरणी विद्यमान अध्यक्ष विजय कोंडके यांनी यूटर्न घेतल्याने त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवल्यानंतर चौकशी हवेत विरली आहे. त्यामुळे वादग्रस्त ठरलेली सात लाखांची रक्कम कोण देणार हा प्रश्न कायम आहे.
‘अभाचिम’चे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप ठेवत त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर अध्यक्ष झालेल्या विजय कोंडके यांनी संबंधित फरकाची रक्कम सुर्वे यांच्याकडून वसूल केली जाईल, असं जाहीर केलं होतं. मात्र आता कोंडके यांनी झालं गेलं विसरून जाऊया असं म्हणत यूटर्न घेतला आहे.
प्रसाद सुर्वे यांच्यावर कारवाई करायला ते तयार नाहीत. त्यामुळे त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं. विजय कोंडके यांनी आम्ही चित्रकर्मी या संघटनेला दिलेल्या पत्रात ही भूमिका मांडलीय. प्रसाद सुर्वे यांच्या कार्यकाळात झालेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमावरून हा वाद झाला होता. आता सुर्वे यांना पाठीशी घातल्यास त्यांच्या काळात वादग्रस्त ठरलेली सात लाखांची रक्कम कोण देणार हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ