उजनी धरण १०० टक्के भरलं

सोलापूरसह पाच जिल्ह्यांना वरदायी ठरलेलं उज्जनी धरण १०० टक्के भरलंय. गेल्या सहा वर्षात हे धरण पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यातच भरलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 17, 2013, 10:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
सोलापूरसह पाच जिल्ह्यांना वरदायी ठरलेलं उज्जनी धरण १०० टक्के भरलंय. गेल्या सहा वर्षात हे धरण पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यातच भरलंय.
उजनी धरणाच्या पाण्याची पूजा केंद्रीय कृषामंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्य़ात आली. जिल्ह्याच्या डाव्या उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आलं.
तसंच सीना आणि भीमेतही पाण्याचा फ्लो सुरू आहे. शेतक-यांनी आपापल्या गावातले ओढे नाले शेततळी भरून घेण्याचं आवाहन पवार यांनी केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.