पुणेकर त्यांच्या दहशतीच्या छायेखाली

पुण्यात भटक्या कुत्रांचा त्रास वाढलाय.महापालिकेच्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. प्रत्येक महिन्याला बाराशेहून अधिक पुणेकरांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त‌ करणं महापालिकेला शक्य होत नाही.

Updated: Aug 17, 2013, 02:47 PM IST

www.24taas.com झी मीडिया, पुणे
पुण्यात भटक्या कुत्रांचा त्रास वाढलाय.महापालिकेच्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. प्रत्येक महिन्याला बाराशेहून अधिक पुणेकरांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त‌ करणं महापालिकेला शक्य होत नाही.
सध्या पुणेकर याच कुत्र्यांमुळे हैराण झाले आहेत. रस्तोरस्ते आणि गल्लीबोळातून असेच भटके कुत्रे तुमच्या नजरेस पडतील. या भटक्या कुत्र्यांची संख्या ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण पुण्यात तब्बल 40 हजार भटकी कुत्रे आहेत. खुद्द पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तशी नोंद आहे. पुण्यातल्या या चिमुकलीला खेळत असताना अशाच एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. या भटक्या कुत्र्यांच्या हैदोसामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहे.
गेल्या 5 महिन्यातली भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांची संख्या पाहिल्यास पुणेकरांना रस्त्यावर चालणं किती कठीण झालंय याचा अंदाज येतोच...
जानेवारी महिन्यात ११९१ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. तर फेब्रुवारी महिन्यात हा आकडा वाढून १२२० इतका झाला. मार्चमध्ये १२९५, एप्रिलमध्ये १३४८ तर मे महिन्यात १३१० इतका झाला. पुणेकर कुत्र्यांच्या चाव्यानं त्रस्त झाले आहेत.
पालिकेकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे सुरु असलेले प्रयत्न कमा पडत आहेत. पुण्यात ४० हजार कुत्रे असताना पालिका महिन्याला फक्त ५०० कुत्रे पकडते. त्यामुळं पालिकेची ही कारवाई ‘उंट के मुहँ में जीरा’ अशाप्रकारची असल्याचा आरोप होत आहे.
गेल्या काही वर्षात ४० हजार नागरिकांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची नोंद पालिकेकडे आहे. अशा कुत्र्यांना पकडून नसबंदी आणि लसीकरणाचे काम पालिकेकडून सुरु आहे. पालिकेचा हा वेग पाहिल्यास पुणेकरांना भटक्या कुत्र्यांपासून मुक्त होण्यासाठी आणखी सात ते आठ वर्षे वाट पाहावी लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.