शिवसेना आमदाराला महिला पोलिसाच्या विनयभंगाबद्दल अटक

कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या 16 कार्यकर्त्यांना जुना राजवाडा पोलीसांनी अटक केलीय.राजेश क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस कर्मचा-यांशी हुज्जत घालुन पोलीसांवर दगडफेक करुन दंगल माजविण्याचा प्रयत्न करुन महिला कर्मचा-यांचा विनयभंग केल्याचा गुन्हा पोलीसात दाखल आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 26, 2013, 06:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या 16 कार्यकर्त्यांना जुना राजवाडा पोलीसांनी अटक केलीय.राजेश क्षिरसागर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस कर्मचा-यांशी हुज्जत घालुन पोलीसांवर दगडफेक करुन दंगल माजविण्याचा प्रयत्न करुन महिला कर्मचा-यांचा विनयभंग केल्याचा गुन्हा पोलीसात दाखल आहे.
कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत घातलेला गोंधळ शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांना चांगलाच भोवलाय.या प्रकरणात क्षीरसागर यांच्यासर 16 शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. ट्युटीवर असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा या सर्वांवर मुख्य आरोप आहे. ही अटक टाळण्यासाठी क्षीरसागर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यावर सुनावणी 30 स्पटेंबरला होणार आहे. अटक टाळण्याचे प्रयत्न निष्फळ झाल्याचं समजताच क्षीरसागर आपल्या समर्थकांसह पोलिसांसमोर हजर झाले. यावेळी काढण्यात आलेल्या मोर्च्यात शिवसेनेच्या उपनेत्या निलम गो-हे यांच्यासह युतीतल्या अनेक नेत्यांनी या मोर्च्यात उपस्थित राहून क्षीरसागर यांना पाठिंबा दिला.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एम.तामणे यांनी आमदार राजेश क्षिरसागर यांच्यासह सोळा कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिलीय. राजेश क्षीरसागर यांनी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान पोलीसांच्या कामकाजात हस्तक्षेप केला नसता तर ही परिस्थिती उद्धभवलीच नसती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अरेरावी करणा-या या लोकप्रतिनिधीला किती दिवस तुरुंगात राहवं लागणार याकडं कोल्हापुरकरांचं लक्ष लागलंय.
Zee Media

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.