www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मुंबईबरोबरच पुण्यातही शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे. जिल्हा उप-प्रमुख अशोक खांडेभराड यांना शिवसेनेतून काढण्यात आलं आहे.
खांडेभराड २९ वर्षापासून शिवसेनेत कार्यरत होते. त्यामुळं त्यांच्यावर झालेल्या कारवाईने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचवेळी दुसरीकडे चार वेळा पक्ष बदल केलेल्या अविनाश राहणे यांना काही दिवसांपूर्वी पुन्हा पक्षात घेण्यात आलं आहे. त्यांना शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख देखील करण्यात आलंय.
अविनाश राहणे यांना पद दिल्याने खांडेभराड यांच्या नाराजीचं मोठं कारण आहे. निष्ठावान शिवसैनिकांवर हा अन्याय असून, त्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जबाबदार आहेत, असा आरोप खांडेभराड यांनी केला आहे.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मनमानी कारभार असाच सुरु राहिल्यास, पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.