रिलायन्सच्या मॉलविरोधात शिवसेनेचं आंदोलन

कोल्हापुरात रिलायन्सनं उभारलेल्या मॉलला नेताजी ‘सुभाषचंद्र बोस’ यांचं मोठं नाव द्यावं या मागणीसाठी आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रिलायन्स विरोधात आंदोलन केलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 16, 2013, 08:14 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापुरात रिलायन्सनं उभारलेल्या मॉलला नेताजी ‘सुभाषचंद्र बोस’ यांचं मोठं नाव द्यावं या मागणीसाठी आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रिलायन्स विरोधात आंदोलन केलं. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेनं परवानगी न देताही हा मॉल कसा सुरू झाला असा सवालही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
कोल्हापूर महापालिकेनं लक्ष्मीपुरी इथं उभारणा-या मॉलला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव द्यावं असा ठराव केला होता. पण या ठरावानुसार नाव देताना रिलायन्स कंपनीनं पळवाट शोधून छोटं नावं दिलंय. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे.

रिलायन्स कंपनीनं 48 तासांच्या आत नेताजींचं मोठं नाव दिलं नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात मॉलसमोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा बोर्ड लावला.