छापासत्रामुळं पांडुरंग घाडगेला सुरू झाल्या उलट्या!

टँकर चोरी प्रकरणातला आरोपी पांडुरंग घाडगेच्या घर आणि गोडावूनवर पोलिसांचं छापा सत्र सुरूच असून आत्तापर्यंत एक कोटी रुपयांचे गाड्यांचे पार्ट आणि साहित्य जप्त करण्यात आलेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 24, 2013, 12:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
टँकर चोरी प्रकरणातला आरोपी पांडुरंग घाडगेच्या घर आणि गोडावूनवर पोलिसांचं छापा सत्र सुरूच असून आत्तापर्यंत एक कोटी रुपयांचे गाड्यांचे पार्ट आणि साहित्य जप्त करण्यात आलेत.
आरोपी पांडुरंग घाडगे पोलिसांना तपास कामात सहकार्य करत नाहीय. सुरुवातीला त्यानं विष प्यायलं, नंतर छाप्याच्या वेळी नातेवाईकांनीच घाडगेच्या घराला आग लावली, आणि आता तर तपास सुरू असताना, घाडगे हा शरीराला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करतोय. तोंडात बोटं घालून उलट्या करणं, दुखापत करून स्वत:ला मेडिकल अनफिट भासवण्याचा तो प्रयत्न करतोय.

पांडुरंग घाडगेवर तीन गुन्हे केले दाखल केलेत. मात्र पांडुरंग घाडगे याचा मुलगा सुखरास घाडगे हा सुद्धा या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आहे, मात्र त्याच्यावर अजून कारवाई झाली नाही. तो ग्रामपंचायत सदस्य असून, तो राजकीय नेता असल्यानं त्याच्यावर कारवाई होत का नाही? असा सवाल ग्रामस्थ विचारतायत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.