www.24taas.com, सांगली
सांगलीचे महापौर इद्रीस नायकवडी त्यांच्या मुलाच्या शाही विवाहामुळं वादात सापडले असतानाच त्यांच्या मुलाच्या लग्नात मनपा कर्मचा-यांना जुंपल्याची धक्कादायक बाब उघड झालीये. सभागृहात महापौरांमागे राजदंड घेऊन उभे राहणा-या शिरस्तेदारालाच लग्नासाठी जुंपल्याचं उघड झालय. या शिरस्तेदारांना पाहुण्यांना सलाम करण्यासाठी ठेवण्य़ात आलं होतं. `झी 24 तास`कडं याचं एक्सक्लूसिव्ह फुटेज मिळालेलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी आदेश दिल्यानंतरही महापौरांनी मुलाचा शाही विवाह केला. हे कमी की काय शाही लग्नात महापालिकेच्या कर्मचा-यांनाही जुंपलं. राष्ट्रवादीच्या महापौराची या नव्य़ा जहागिरदारीवर पक्षातूनच टीका होतेय. नेते सरकारी कर्मचारी जुंपतायेतच आता सरकारी यंत्रणाच बटीक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान याप्रकरणी इद्रिस नायकवडी यांची बाजू जाणून घेण्याचा `झी 24 तास`नं प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
शिवाय रोज नवीन मुद्दा दाखवणार त्यावर मी बोलणार नाही असं त्यांनी सांगितलं.. शिवाय जे वृत्त दाखवायचं ते दाखवा असंही ते म्हणाले... तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी इद्रिस नायकवडी यांच्या या कृतीवर टीकास्त्र सोडलं आहे.