पोलिसांच्या छळाला वैतागून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी पोलिस स्थानकात एका आरोपीनं आत्म्हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं या आरोपीचं म्हणणं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 17, 2012, 08:16 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी पोलिस स्थानकात एका आरोपीनं आत्म्हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं या आरोपीचं म्हणणं आहे.
चोरीच्या आरोपावरून जमील खान या सराइत गुन्हेगारांला पिंपरी पोलिस स्थानकाच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी जमीलनं कोठडीच्या भिंतीवर डोकं आढळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दहा ते पंधरा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करत या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं जमीलचं म्हणणं आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस मात्र याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. गेले काही दिवस शहरात गुन्हेगारी वाढत चालल्यानं पोलिसांवर टीक होतेय. त्यातच आता या घटनेमुळे पोलिसांच्या विश्वासर्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय...